full-width


आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

                 सुदृढ आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्याच्याकडे उत्तम आरोग्याची संपत्ती आहे, तो खूप भाग्यवान असतो. आरोग्य हीच यशस्वी, आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

                सुदृढ आरोग्यासाठी, मेंदूचे कार्य उत्तम चालण्यासाठी, चांगल्या स्मरणशक्तीसाठी, तरुण दिसण्यासाठी, मुलायम सतेज कांतीसाठी, हाडांच्या आणि सांध्यांच्या मजबूतीसाठी, पचनशक्ती वाढण्यासाठी आणि भोजनातील स्वाद तृप्तीची अनुभूती होण्यासाठी, पोटातील आणि शरीरातील वेगवेगळे hormones आणि enzymes चे कार्य सुस्थितीत चालण्यासाठी तेल हा महत्त्वाचा घटक आहे. पण हाच महत्त्वपूर्ण घटक आज पूर्णपणे दुर्लक्षित झाला आहे.

                समृद्धी लाकडी घाणाफ आपल्या आरोग्यासाठी, पारंपरिक नैसर्गिक पद्धतीने तेल तयार करण्याचे काम करत आहे.

                आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील वात, पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी कर्म संतुलित तोच खरा निरोगी. बहुतांशी आजार हे घटक बिघडल्यामुळे होतात. आजार टाळण्यासाठी शरीरातील वातदोष संतुलित ठेवणारे पदार्थ सेवन करावेत. हे संतुलन सांभाळणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे मलाकडी घाण्याचे शुद्ध तेल.

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल म्हणजे काय?

आपण सर्रास वापरत असलेले रिफार्ईंड तेल म्हणजे काय? ते कसे तयार होते? रिफार्ईंड तेलाचे नेमके धोके कोणते? याविषयी जाणून घेऊया...

लाकडी घाण्याचे शुद्ध तेलः

* लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे chemical वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते.

* प्रत्येक शुद्ध तेलाला वेगळा आणि विशिष्ट सुगंध असतो, तो वेगळा सुगंधच त्या तेलाची ओळख असते. विशिष्ट सुगंधासाठी त्या तेलातील वेगवेगळे फॅटी असिड्स, प्रोटीन्स इतर घटकांची वैशिष्ट्यपूर्ण संरचना कारणीभूत असते.

 

* शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो, कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड संतुलित प्रमाणात असतात. Vitamin ‘E’, फायबर आणि विविध खनिजे सुद्धा असतात, तसेच ते अनेक नैसर्गिक आरोग्यपूर्ण स्वास्थवर्धक गुणधर्मांनी परिपूर्ण असते.

* लाकडी घाण्यावरचे तेलच सर्वोत्तम असते. कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे तेलबियांवरती अतिरिक्त दाब दिला जात नाही, शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 13-14 वेळाच फिरतो. थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM 13-14 असतो. त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही.

* आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक High-Density Lipoproteins (HDL). हा आपल्या यकृत (Liver) मध्ये तयार होतो, मात्र तो शुद्ध तेल खाल्ले तरच तयार होतो; म्हणूनच आहारात शुद्ध तेल अवश्य असावे. तसेच शुद्ध तेले योग्य प्रमाणात घेतल्यास LDL कमी होते.

* शुद्ध तेल खाल्ल्याने शरीरातील वातदोष संतुलित राहतो आणि त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटिस, सांधेदुखी, पॅरालिसिस, ब्रेन डॅमेज सारख्या गंभीर आजारांमध्ये लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आहारात असणे अधिक उपयोगाचे आहे.

* भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायू होते. सरासरी आयुर्मान 100 वर्षेे होते. 

 

* लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेल तापमान 40-450C पेक्षा जास्त नसते, त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक Bioactive घटक नष्ट होत नाही. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात, म्हणून चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे.

                तसेच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो म्हणजे शेंगदाण्याच्या तेलामुळे कोलेस्टेरॉल वाढते. हे चुकीचे आहे. उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे HDL वाढते आणि HDL आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. तेलातील संतुलित प्रमाणात असणारे Polyunsaturated Fatty Acids (PUFA)& Monounsaturated Fatty Acid (MUFA) उत्तम प्रकारे Fatty acid metabolism प्रक्रिया पूर्ण करतात. पारंपरिक तेल बनविण्याची पद्धत ही कित्येक हजार वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. तेव्हापासून विविध तेलांचा पारंपरिक पद्धतीने तयार करण्याचा आहारात उपयोग करण्याचा परिपाठ चालूच होता आणि आहे. याचाच अर्थ असा की, पारंपरिक लाकडी घाण्याच्या तेलामुळे कोणी जाड, कोणी कृश असा दुष्परिणाम दिसत नव्हता. निरोगी माणसे 100 वर्षे जगायची, मग गेल्या 50-60 वर्षांपासूनच रिफार्ईंड तेल बनविण्याचा उपक्रम किंवा खटाटोप कशा करता केला गेला असावा?